Manish Jadhav
आयपीएल 2025 सध्या अनेक विक्रम होत आहेत. यातच, सोमवारी (7 एप्रिल) आरसीबीविरुद्ध मैदानात उतरताच मुंबई इंडियन्सने टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला. मुंबई टी-20 मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा संघ बनला.
मुंबईने आरसीबीविरुद्ध क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील आपला 288 वा सामना सोमवारी खेळला. या बाबतीत मुंबईने सोमरसेट संघाल मागे सोडले. सोमरसेटने आतापर्यंत एकूण 287 टी-20 सामने खेळले आहेत.
सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याच्या यादीत आता मुंबई इंडियन्स, सोमरसेटनंतर हॅम्पशायर तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी 275 सामन्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. मुंबईने पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले आहे.
सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने मुंबई संघात पुनरागमन केले. मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र मुंबईला या सामन्यात घरच्या मैदानावर आरसीबीकडून पराभवाचा सामना करावा लागला.