Sameer Panditrao
कधी कधी आपल्या भोवती अनेक लोक असतात, पण आपल्यासाठी खरंच कोण ठामपणे उभं राहतं हे ओळखणं महत्त्वाचं असतं.
तुमच्याबद्दल ज्यांना खरंच काळजी असते, ते तुम्हाला दरवेळी शब्दांत नाही तर कृतीतून समजून घेतात.
सुखात सगळे येतात, दुःखात जे थांबतात, त्यांच्यावर विश्वास ठेवावा.
खरं प्रेम करणारे तुमचं बोलणं ऐकतात, भाव ओळखतात. ते तुमची मनस्थिती समजून तुमच्याशी वागतात.
स्वार्थ सोडून गरजा, भावना, वेळ यांचा आदर करतात तेच तुमचे खरे.
खरंच काळजी करणारे तुमचं यश, आत्मविश्वास, प्रगती पाहून ईर्षा करत नाहीत… ते तुमच्या यशात स्वतःचं यश मानतात.
तुमच्याशी निस्वार्थ नातं ठेवणारे लोक हेच तुमचं खरी माणसं असतात. त्या नात्यांना जपा, कारण तेच जीवनातली खरी संपत्ती आहेत.