Sameer Panditrao
शिवरायांच्या सहकार्याने जावळीच्या मोऱ्यांचा वंशज गादीवरती बसला होता आणि कारभार पाहत होता.
हा चंद्रराव यशवंतराव मोरे हळूहळू स्वराज्यात घुसू लागला. वतनांवर आपला हक्क सांगू लागला लोकांना त्रास देऊ लागला.
महाराजांनी त्याच्याशी पत्रव्यवहार साधला. त्याने महाराजांना उलट उत्तर दिले. सोबत चर्चाही फिसकटल्या.
तयार मावळ्यांनी जावळीवर आक्रमण केले आणि मोर्चेबांधणी केली.
चंद्रराव जावळी सोडून पळाला आणि दौलताबाद पेक्षा दसपट उंच रायरीमध्ये लपला.
महाराजांच्या आदेशाखाली मावळ्यांनी रायरीला वेढा दिला आणि चंद्रराव शरण आला.
महाराजांना गड प्रचंड आवडला. कालांतराने त्याला रायगड असे नाव देण्यात आले.