Robert Fico: कोण आहेत स्लोव्हाकियाचे PM रॉबर्ट फिको? अज्ञाताने झाडल्या गोळ्या

Manish Jadhav

स्लोव्हाकियाचे लोकप्रिय PM रॉबर्ट फिको

स्लोव्हाकियाचे लोकप्रिय पंतप्रधान रॉबर्ट फिको सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. 15 मे रोजी हँडलोवा शहरात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Slovakia PM Robert Fico | Dainik Gomantak

हत्येच्या प्रयत्न

रॉबर्ट फिको यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Slovakia PM Robert Fico | Dainik Gomantak

जुराज सिंटुला या 71 वर्षीय व्यक्तीने हल्ला केला

स्लोव्हाकियन मीडियाने हल्लेखोराची ओळख पटवली, जुराज सिंटुला या 71 वर्षीय कवीने पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

Slovakia PM Robert Fico | Dainik Gomantak

कोण आहेत रॉबर्ट फिको?

59 वर्षीय रॉबर्ट फिको यांचा जन्म 1964 मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकियामध्ये झाला होता. ते विवाहित असून त्यांना एक अपत्यही आहे.

Slovakia PM Robert Fico | Dainik Gomantak

फिको पहिल्यांदा स्लोव्हाक संसदेत निवडून आले

कम्युनिझमच्या पतनापूर्वी ते कम्युनिस्ट पक्षात सामील झाले, 1986 मध्ये कायद्याची पदवी मिळवली आणि 1992 मध्ये डेमोक्रॅटिक डाव्या पक्षासोबत पहिल्यांदा स्लोव्हाक संसदेत निवडून आले.

Slovakia PM Robert Fico | Dainik Gomantak

फिको यांनी स्लोव्हाकियाचे प्रतिनिधीत्व केले

फिको यांनी 1990 च्या दशकात फिको यांनी स्लोव्हाकियाचे प्रतिनिधीत्व करणारे सरकारी एजंट म्हणून युरोपियन मानवाधिकार न्यायालय आणि युरोपियन मानवाधिकार आयोगात काम केले.

Slovakia PM Robert Fico | Dainik Gomantak

फिको पहिल्यांदा PM कधी बनले

फिको यांनी पहिल्यांदा 2006 ते 2010 आणि नंतर 2012 ते 2018 पर्यंत पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्या तिसऱ्या टर्ममुळे ते स्लोव्हाकियाचे सर्वात जास्त काळ सत्तेत असणारे नेते बनले.

Slovakia PM Robert Fico | Dainik Gomantak
PM Narendra Modi | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी