Manish Jadhav
यंदाची लोकसभा निवडणुक अनेक अर्थांनी वेगळी आहे. पंतप्रधान मोदींना सत्तेपासून परावृत्त करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे.
पीएम मोदींनी 14 मे रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पीएम मोदींकडे सुमारे 3 कोटींची संपत्ती आहे. जरी त्यांच्याकडे ना घर आहे ना कार.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पीएम मोदींकडे एकूण 52,920 एवढी रोकड आहे. याशिवाय त्यांच्या बँक खात्यात 73304 रुपये जमा आहेत. त्यांच्या स्टेट बँक ऑफ गुजरात, गांधीनगरमधील खात्यात 73304 रुपये आहेत, तर वाराणसीतील त्यांच्या SBI खात्यात फक्त 7000 हजार रुपये आहेत.
याशिवाय, त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2,85,60,338 कोटी रुपयांची एफडी आहे. पीएम मोदींनी 9,12,398 रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे घेतली आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या असून, त्यांची एकूण किंमत 2,67,750 रुपये आहे.
2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पीएम मोदींचे उत्पन्न 11,14,230 रुपये होते. 2020-21 मध्ये त्यांचे उत्पन्न 17,07,930 रुपये होते. 2021-22 मध्ये पंतप्रधानांकडे 15,41,870 रुपयांची संपत्ती होती, तर 2022-23 मध्ये पंतप्रधानांचे उत्पन्न 23,56,080 रुपये होते. 2023-24 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 3,02,06,889 रुपये आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पगार आणि कमाईच्या आधारे कर भरतात. 2023-24 या आर्थिक वर्षात पीएम मोदींनी 3 लाख 33 हजार 179 रुपये आयकर भरला आहे.