कोण आहे शोएब मलिकची नवी नवरी सना जावेद?

Pranali Kodre

शोएब मलिकचे लग्न

पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर लग्न केल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले.

Shoaib Malik married Sana Javed | Instagram

कोण आहे सना जावेद?

त्यामुळे सना जावेद कोण आहे, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

Sana Javed | Instagram

जन्म

सनाचा जन्म सौदी अरेबियामध्ये 25 मार्च 1993 रोजी झाला. तिने कराची विद्यापिठातून तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Sana Javed | Instagram

अभिनय क्षेत्रात पदार्पण

ती गेली अनेकवर्षे मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आहे. तिने शहर-इ-ज़ात या सिरियलमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

Sana Javed | Instagram

विशेष ओळख

दरम्यान, खानीमधील तिच्या भूमिकेमुळे तिला विशेष ओळख मिळाली. तिच्या भूमिकेसाठी तिला लक्स स्टाईल ऍवॉर्डसाठी नामांकनही मिळाले होते. याशिवाय देखील तिने काही उर्दू सिरियलमध्ये केलेल्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या.

Sana Javed | Instagram

सनाचे दुसरे लग्न

दरम्यान, सनाचेही शोएबरोबर हे दुसरे लग्न आहे. तिने यापूर्वी 2020 मध्ये पाकिस्तानी अभिनेता, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक उमर जसवालबरोबर निकाह केला होता.

Sana Javed | Instagram

सनाचा घटस्फोट

मात्र अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार 2023 मध्ये तिचा आणि उमर यांचा घटस्फोट झाला आहे.

Sana Javed | Instagram

शोएब-सनाचं लग्न

त्यानंतर आता तिने शोएबबरोबर लग्नगाठ बांधली. शोएबने यापूर्वी 2002 मध्ये आयेशा सिद्दिकीबरोबर लग्न केले होते. त्याचे हे लग्न 2010 पर्यंत टिकले.

Sana Javed | Instagram

शोएब-सानिया

त्यानंतर 2010 मध्ये त्याने सानियाशी हैदराबादमध्ये लग्न केले. सानिया आणि शोएब यांना इझहान हा मुलगाही आहे, ज्याचा जन्म 2018 साली झाला.

Shoaib Malik - Sania Mirza | Instagram

भारतासाठी T20I मध्ये सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्या जोड्या

Rohit Sharma - Rinku Singh | X/BCCI
आणखी बघण्यासाठी