Pranali Kodre
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात बंगळुरुमध्ये 17 जानेवारी 2024 रोजी टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने दोन सुपर ओव्हरनंतर विजय मिळवला.
या सामन्यात भारताने 5 षटकांच्या आतच 22 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (121*) आणि रिंकू सिंग (69*) यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 190 धावांची विक्रमी भागीदारी रचली.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी करण्याचा विक्रम रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांच्या जोडीच्या नावावर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी करणाऱ्या जोड्यांच्या यादीत रोहित आणि रिंकूनंतर संजू सॅमसन आणि दीपक हुडा असून त्यांच्या जोडीे 2022 मध्ये आयर्लंडविरुद्ध 176 धावांची भागीदारी केली होती.
या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आणि रोहित शर्मा आहेत. या दोघांनी 2017 साली श्रीलंकेविरुद्ध इंदूरला 165 धावांची भागीदारी केली होती.
यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांची जोडीही या यादीत संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 2023 साली लॉडरहिलला झालेल्या सामन्यात 165 धावांची भागीदारी केली होती.