Akshata Chhatre
११ मार्च म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदानदिन. छावा या चित्रपटाने अलीकडेच भरपूर नाव कमावलं आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस पडलाय.
विकी कौशल या अभिनेत्याने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. महाराजांवर औरंगजेबाने अतोनात अत्याचार केले होते आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना हे दाखवणं कठीण होतं.
चित्रपटातील याच सिनचा अनुभव दिग्दर्शक उतेकर यांनी मांडला. लक्ष्मण उतेकर म्हणाले की या शूटसाठी विकीचे हात रातभर बांधून ठेवले होते जायचा परिणाम त्याच्या शरीरावर झाले.
विकीचे हात मोकळे करताच हात एकाच जागी स्तब्ध झाले होते आणि म्हणून चित्रपटाचं शूटिंग थांबवावं लागलं होतं. दिग्दर्शक म्हणतात की, यामुळे दीड महिना शूटिंग थांबलं होतं. विकीला रिकव्हर होण्यासाठी वेळ देण्यात आला होता, त्याच्या शारीरिक जखमा भरून निघण्यासाठी हा ब्रेक होता.
लक्ष्मण उतेकर असं देखील म्हणाले होते की छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने पकडलेल्या दिवशीच चित्रपटात हा सिन शूट झाला होता.
विकी आणि अक्षय खन्ना यांच्यामध्ये देखील या सीनच्या शूट दरम्यान कोणताही संवाद न झाल्याचं दिग्दर्शक म्हणाले.