तेलंगणात मुख्यमंत्री पदाचा नवा चेहरा 'रेवंत रेड्डी'

Manish Jadhav

तेलंगणात कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार

तेलंगणातील सुरुवातीच्या ट्रेंडनुसार काँग्रेस सध्या प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करत आहे. अशा स्थितीत सरकार स्थापन केल्यानंतर तेलंगणाचा मुख्यमंत्री कोणाला करणार या विचारात सर्वोच्च नेतृत्व व्यस्त आहे. या यादीतील सर्वात मोठा चेहरा म्हणजे तेलंगणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांचा आहे.

Revanth Reddy | Dainik Gomantak

कोण आहेत रेवंत रेड्डी

तेलंगणात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते म्हणजे रेवंत रेड्डी. सध्या रेवंत रेड्डी हे तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे युनिट अध्यक्ष आहेत.

Revanth Reddy | Dainik Gomantak

रेवंत रेड्डी यांचा जन्म

रेवंत रेड्डी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1967 रोजी अविभाजित आंध्र प्रदेशातील नगरकुर्नूल येथील कोंडारेड्डी पल्ली येथे झाला. रेवंतच्या वडिलांचे नाव अनुमुला नरसिंह रेड्डी आणि आईचे नाव अनुमुला रामचंद्रम्मा आहे.

Revanth Reddy | Dainik Gomantak

रेवंत रेड्डी यांचे शिक्षण

रेवंत यांनी हैदराबादच्या ए.व्ही. कॉलेजमधून फाइन आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रेवंत यांनी प्रिटिंग प्रेस सुरु केली.

Revanth Reddy | Dainik Gomantak

रेवंत रेड्डी यांचे वैवाहिक जीवन

7 मे 1992 रोजी रेवंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची अनुमुला गीता यांच्याशी लग्न केले.

Revanth Reddy | Dainik Gomantak

रेवंत यांचा राजकीय प्रवास

लग्नानंतर काँग्रेस खासदार रेवंत यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. ज्याची कहाणी खूप रंजक आहे. विद्यार्थीदशेत रेवंत हे आरएसएसच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित होते.

Revanth Reddy | Dainik Gomantak

रेड्डी यांनी 2006 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली

2006 मध्ये, रेड्डी यांनी अपक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवली आणि मिडझिल मंडळातून जिल्हा परिषद क्षेत्र समितीचे सदस्य म्हणून निवडून आले होते.

Revanth Reddy | Dainik Gomantak

जायंन्ट किलर

2009 मध्ये, रेवंत यांनी टीडीपीच्या तिकिटावर आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि 6,989 मतांनी विजय मिळवला. कोडंगल मतदारसंघातून रेवंत यांनी पाच वेळचे काँग्रेसचे आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव करुन पहिल्यांदाच आमदार झाले.

Revanth Reddy | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी