बोक द व्हॉक : पणजीतील नैसर्गिक पाण्याचा पोर्तुगीजकालीन स्त्रोत...

Akshay Nirmale

गोमुख

गोव्याची राजधानी पणजीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या झरीचे नाव आहे बोक द व्हॉक (Boca de vaca). याला गोमुख असेही म्हटले जाते.

Boca de vaca, Panaji, Goa | Dainik Gomantak

पोर्तुगीजकालीन

हा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आहे. ही झर पोर्तुगीजकालीन असल्याचे सांगितले जाते.

Boca de vaca, Panaji, Goa | Dainik Gomantak

औषधीयुक्त पाणी

सध्या या झरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात नसला तरी पुर्वी येथील पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. तसेच हे पाणी औषधीयुक्त असल्याचे मानले जात होते.

Boca de vaca, Panaji, Goa

सौंदर्यीकरण

दिवंगत मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री असताना गोव्याचा हा अनोखा वारसा जपण्याचा प्रयत्न झाला होता. 2018 मध्ये या झरीचे सौंदर्यीकरण केले गेले होते.

Boca de vaca, Panaji, Goa

पारदर्शक फरशी

या झरीच्या बोगद्यात पारदर्शक फरशा बसवल्या होत्या. त्या खालून वाहणारे पाणी दिसायचे.

Boca de vaca, Panaji, Goa

पाण्यावरून चालण्याचा अनुभव

जवळपास शंभर फूटांहून अधिक लांबीचा हा बोगदा असून यातून जाताना पाण्यावरून चालण्याचा अनुभव घेता येत होता.

Boca de vaca, Panaji, Goa

सौंदर्य लोपले

आता या झऱीचे सौंदर्य लोपले आहे. येथील बोगद्यांमध्ये गाळ साचला आहे. येथे स्वच्छता ठेवण्याची गरज आहे.

Boca de vaca, Panaji, Goa | Dainik Gomantak

संवर्धनाची गरज

सध्या झरीची दुरवस्था झाली आहे. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असलेल्या झरीचे संवर्धन करण्याची गरज आहे.

Boca de vaca, Panaji, Goa | Dainik Gomantak
Fermagudi Fort, Panaji, Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...