Sameer Amunekar
समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहबादिया आला होता.
शोमध्ये रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा स्पर्धकाला प्रश्न विचारतात. रणवीर स्पर्धकाला यावेळी अश्लील प्रश्न विचारतो.
रणवीरच्या अश्लील प्रश्नामुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रणवीर अलाहाबादिया हा एक प्रसिद्ध भारतीय यूट्यूबर, पॉडकास्टर, उद्योजक आणि कंटेंट क्रिएटर आहे.
रणवीरचा "BeerBiceps" नावाचा यूट्यूब चॅनेल आहे. तो सेल्फ-इम्प्रूव्हमेंट, बिझनेस, हेल्थ, फिटनेस आणि मोटिव्हेशन यासंदर्भात माहिती शेअर करतो.
रणवीर अलाहाबादिया भारतातील सर्वात यशस्वी पॉडकास्टर्सपैकी एक आहे. त्याच्या The Ranveer Show पॉडकास्टवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जातात.