Ashutosh Masgaunde
दुबई येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत (COP-28) जीवाश्म इंधनाबाबत चर्चा सुरू आहे. या परिषदेत 200 देशांतील 60 हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
भारतीय हवामान कार्यकर्ती लिसिप्रिया कंगुजम अचानक या जागतिक व्यासपीठावर पोहोचली. आणि हातात पोस्टर घेऊन ती स्टेजवर धावू लागली आणि ओरडू लागली, “जीवाश्म इंधन बंद करा… जीवाश्म इंधन बंद करा.”
१२ वर्षांची लिसिप्रिया भारतातील मणिपूर येथील असून, ती द चाइल्ड मुव्हमेंटची संस्थापक आहे. तिचा जन्म 2 ऑक्टोबर 2011 रोजी झाला होता.
लिसिप्रिया कंगुजम, हवामान संकटावर आवाज उठवणारी सर्वात लहान कार्यकर्ती आहे. तिने 2019 मध्ये माद्रिद, स्पेन येथे आयोजित COP25 मध्ये जागतिक नेत्यांना संबोधित केले होते.
हवामान संकटाबाबत जागृती निर्माण केल्याबद्दल तिला अनेक पुरस्कार आणि सन्मानही मिळाले आहेत.
लिसिप्रिया कंगुजमने तिच्या या आंदोलनाचा व्हिडिओ ट्विट केला असून, "यानंतर मला अर्धा तास कोठडीत ठेवण्यात आले," असे तिने लिहिले आहे.
जागतिक हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गला लिसिप्रिया कंगुजम आदर्श मानते.