हाच तो दिवस... 22 वर्षांपूर्वी हादरले होते लोकशाहीचे मंदिर

Ashutosh Masgaunde

13 डिसेंबर 2001

13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवनावर हल्ला केला होता.

Parliament Attack 2001 | Dainik Gomantak

नऊ जणांचा मृत्यू

या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दिल्ली पोलिसांचे सहा कर्मचारी, संसद सुरक्षा सेवेचे दोन कर्मचारी आणि एका माळ्याचा समावेश होता. त्याचवेळी हल्ला करण्यासाठी आलेले सर्व दहशतवादी मारले गेले.

Parliament Attack 2001 | Dainik Gomantak

अ‍ॅम्बेसेडर

पांढऱ्या अ‍ॅम्बेसेडर कारमधून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवनावर गोळ्यांचा वर्षाव केला. यावेळी एका दहशतवाद्याने संसद भवनाच्या गेटजवळ बॉम्बने स्वत:ला उडवले होते.

Parliament Attack 2001 | Dainik Gomantak

कोण होते दहशतवादी?

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हैदर उर्फ ​​तुफैल, मोहम्मद राणा, रणविजय आणि हमजा यांचा समावेश आहे.

Parliament Attack 2001 | Dainik Gomantak

जसवंत सिंहांची भीती खरी ठरली

त्यावेळी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात असलेल्या जसवंत सिंह यांनी संसदेवर अशा प्रकारचा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली होती. ती अखेर खरी ठरली, असे त्यांनी एका पुरस्ताकात लिहिले आहे.

Parliament Attack 2001 | Dainik Gomantak

सूत्रधार

या दहशतवादी हल्ल्यामागे मोहम्मद अफजल गुरू, एसएआर गिलानी आणि शौकत हुसैन यांच्यासह पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात होता.

Parliament Attack 2001 | Dainik Gomantak

अफझल गुरू

संसद हल्ल्याच्या १२ वर्षांनंतर ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफझल गुरूला फाशी देण्यात आली.

Parliament Attack 2001 | Dainik Gomantak

Bhajanlal Sharma: गोष्ट फर्स्ट टर्म आमदाराच्या मुख्यमंत्रीपदाची

Bhajanlal Sharma | Bhajanlal Sharma, X
अधिक पाहाण्यासाठी...