Akshata Chhatre
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षानंतर आता अननोन गनमॅन नावाचा नवीन शब्द बराच वापरा जातोय. पण म्हणजे कोण? आणि ही लोकं नेमकं करतात तरी काय? जाणून घेऊया..
देशाच्या दुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या व्यक्तींना किंवा गटांना यांच्याकडून लक्ष्य केलं जातं. ज्यामध्ये दहशतवादी संघटनांशी संबंधित गटांचा समावेश असतो.
या घटनांमध्ये कोणत्याही संघटनेचे उघडपणे नाव घेतलं जात नाही. त्यामुळे यांना "गुप्त हल्लेखोर" म्हणणं उचित ठरतं. असे ऑपरेशन्स संघटनेशिवाय, जबाबदारीशिवाय, आणि कोणतेही प्रत्यक्ष पुरावे न देता केले जातात.
माध्यमं या प्रकारच्या घटनांचं वर्णन करताना अननोन गनमॅन असं नाव वापरतात, कारण त्यांच्याकडे पक्के पुरावे नसतात आणि त्यांना कोणालाही थेट दोष देता येत नाही.
काही विश्लेषकांचं मत आहे की हे हल्लेखोर भारताच्या गुप्तचर संस्थांशी संबंधित असू शकतात, जे भारतविरोधी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी गुप्त मोहीम चालवतात.
काहीजणांच्या मते अशी लोकं शत्रूवर नजर ठेवून असतात तर काहींच्या मते केवळ मध्यमांकडून वापरली जाणारी ही एक कथा आहे.