Akshata Chhatre
२००५ साली, इंटरनेटच्या इतिहासात एक महत्त्वाचा दिवस ठरला, कारण त्या दिवशी यूट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड झाला होता. हा तोच युट्युब आहे ज्याचा आपण भरपूर वापर करतोय. पण कधी विचार केला का पहिला व्हिडिओ कशाचा असेल?
या व्हिडिओचे नाव होते “Me at the Zoo” आणि तो जावेद करीम यांनी अपलोड केला होता.
आज तीन तीन तासांचे चित्रपट सुद्धा अपलोड होणाऱ्या युट्युबवर तेव्हा हा फक्त १९ सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, ज्यामध्ये जावेद सं डिएगो झूमध्ये हत्तींबद्दल बोलताना दिसतात.
ही घटना २३ एप्रिल २००५ च्या दिवशी घडली आणि त्याच क्षणी यूट्यूबचा प्रवास सुरू झाला.
आज यूट्यूब जगातील सर्वात मोठं व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म बनलं आहे. युट्युबच्या पहिल्या व्हिडिओला आता ३५ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि तो अजूनही यूट्यूबवर पाहता येतो.
‘Me at the Zoo’ हा व्हिडिओ केवळ एक सुरुवात होती पण याने डिजिटल युगाची दिशा बदलली.