Akshata Chhatre
लिंबामध्ये व्हिटॅमिन सीचा समावेश असतो, जे टॅनिंग दूर करतं, डाग आणि मुरुम कमी करतं आणि त्वचेला नैगिक चमक मिळते.
१ चमचा लिंबाचा रस, १ चमचा मध, १ चमचा बेसन आणि गरज असल्यास गुलाबपाणी एकत्र करून मिश्रण तयार करा.
सर्व घटक एका वाटीत मिक्स करा, पेस्ट तयार होईपर्यंत ढवळा आणि ही पेस्ट तोंडावर लावा.
मास्क लावायच्याआधी चेहरा स्वच्छ धुवा, ब्रश किंवा बोटांनी मास्क लावा मात्र डोळ्यांच्या आजूबाजूला मास्क लावणं टाळा आणि हा मास्क किमान १५ मिनिटं सुकूद्या.
आठवड्यातून २ वेळा रात्री झोपण्यापूर्वी हा मास्क लावावा आणि मास्क धुतल्यानंतर मॉइश्चरायझर वापर करावा.
संवेदनशील त्वचा असल्यास आधी तुम्हाला हा मास्क किती सूट होतोय हे तपासून घ्या. लिंबाचा रस डोळ्यांमध्ये जाऊ देऊ नका.