गोमन्तक डिजिटल टीम
रात्रीची झोप न येणं, मग उशीरा झोप लागणं आणि सकाळी जाग न येणे अशा समस्या सध्या सर्वच वयोगटात दिसून येतात.
ताण, सोशल मीडिया, शारीरिक तक्रारी यांमुळे उद्भवणारी झोपेची समस्या सर्वत्र पाहायला मिळते.
रात्रीची पुरेशी झोप झाली नाही की पचनाच्या तक्रारी, महिलांमध्ये पाळीच्या तक्रारी, हृदयाशी निगडीत तक्रारीही उद्भवतात.
आपण पालथे झोपतो, पाठीवर झोपतो, डाव्या कुशीवर किंवा उजव्या कुशीवर झोपत असतो.
पोटावर झोपल्याने मणक्यावर मानेवर ताण येऊ शकतो. तसेच पचनक्रियेवरही विपरित परिणाम होतो.
पाठीवर झोपण्याचे फायदे आहेत त्याप्रमाणे काही तोटेही आहेत. ज्यांना सर्व्हायकल स्पॉंडीलायसिस, खांदेदुखीसारखे त्रास असतील त्यांनी नक्की पाठीवर झोपायला हवे.
एका कुशीवर झोपणे चांगली गोष्ट आहे. डाव्या कुशीवर झोपणारे लोक काळजीवाहू प्रकारातले असतात.उजव्या कुशीवर झोपणारे लोक हे योगी मानले जातात.