Pramod Yadav
भारताचा फिरकीपटू आर. आश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
शंभराव्या कसोटीनंतर आश्विनने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. कसोटीत आश्विनच्या नावे ५०० बळींची नोंद आहे.
आश्विन एक गुणवंत क्रिकेटर म्हणून ओळखला जातो पण, सात वर्षापूर्वी तो करिअरच्या खडतर प्रवासातून जात होता.
आश्विन एवढा खचला होता की, त्याने क्रिकेटसोडून एमबीएचे शिक्षण घेऊन मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला होता.
झाले असे की, २०१७ साली चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरोधात भारताच्या पदरात पराभव पडला होता.
यानंतर आश्विनला काहीही कल्पना न देता व्हाईट बॉल क्रिकेटमधून बाहेर बसवलं, यानंतर आश्विन फार खचला होता.
आश्विन क्रिकेट करिअर सोडण्याचा विचार करत होता. दरम्यान, काही महिने यातून जात असताना त्याने बाह्य मदत घेऊन पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.