Sameer Panditrao
राज्यात नारळ, केळी, काजू आदींची बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात तसेच सुपारी लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते.
नारळ आणि पोफळी व इतर बागायती पिके राज्यातील सर्वच भागात घेतली जातात. राज्यात वर्षाला ४ हजार टन सुपारीचे उत्पादन घेतले जाते.
२०२४-२५ आर्थिक वर्षात राज्यात सुमारे ४००२ टन इतके सुपारी उत्पादन घेण्यात आले.
१२३ हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली आहे. सर्वाधिक १९८६ टन उत्पादन फोंडा तालुक्यातील आहे.
उत्तर गोव्यातील ५९२ हेक्टर क्षेत्रफळ सुपारी लागवडीखाली असून १०८५ टन उत्पादन आहे.
दक्षिण गोव्यात १५३१ हेक्टर क्षेत्रफळ लागवडी खाली असून २९३१ टन उत्पादन आहे.
मागील काही वर्षांपासून पाऊस, अवेळी गळून पडणारी सुपारी, माकड आणि खेत्यांमुळे होणारे नुकसान अशा अनेक कारणांमुळे सुपारी उत्पादन तोट्याचे ठरू लागले आहे.
गोव्यात 'या' फळाला जोरदार बहर