दैनिक गोमन्तक
दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे आपल्या सगळ्यांनाच माहीती असते.
मात्र दूधाचे प्रकार आणि कोणते दूध आरोग्यासाठी उत्तम हे तुम्हाला माहीती आहे का?
A1 प्रकारचे दूध आणि A2 प्रकारचे दूध असे दूधाचे प्रकार पडतात.
A1 आणि A2 दूधामध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात.
A1 दूध हे हायब्रीड गायींपासून मिळते.
तर A2 दूध देशी गाईंपासून म्हणजेच भारतीय जातींच्या गायींपासून मिळणारे दूध आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या आरोग्यासाठी A2 प्रकारचे म्हणजेच भारतीय जातींच्या गायींचे दूध उत्तम ठरते.