Sameer Panditrao
नवपाषाणयुगीन क्रांतीची सुरुवात भारतात कुठून झाली?
मेहरगड हे नवपाषाणयुगातील एक अत्यंत महत्त्वाचं पुरातत्त्वीय स्थळ आहे.
मेहरगडमध्ये मानवाने अन्न उत्पादन करण्यास सुरुवात केल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत.
भारतात प्रथम बार्ली धान्याचे उत्पादन घेण्यात आले.
इथे बार्ली आणि गहू या धान्यांची लागवड केली जात असल्याचे पुरावे मिळाले.
फक्त शेतीच नाही, तर मेहरगडमध्ये प्राण्यांचे पाळीव रूपात पालन केल्याचे पुरावेही मिळतात.
भारताच्या उत्तर भागातील बेलन आणि गंगेच्या खोऱ्यात तांदळाची लागवड सुरू झाल्याचे पुरावे आढळले आहेत.