Sameer Panditrao
वेरूळचे बाबाजीराजे भोसले यांच्याकडे दहा गावची पाटीलकी होती.
बाबाजीराजे भोसले यांची मालोजीराजे आणि विठोजीराजे ही दोन अपत्ये.
तत्कालीन परकीय आक्रमणात अनेक महाराष्ट्राची, इथल्या मंदिराची अवस्था बिकट झाली होती.
मालोजीराजेंनी अर्थात छ. शिवरायांच्या आजोबांनी वेरूळचे घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला, शिखर शिंगणापूर परिसरात महत्वपूर्ण कामे केली.
धर्मकार्यासोबत मालोजीराजेंनी वेरूळ परिसरात पाणपोई, रस्ते अशी अनेक समाजकार्ये आरंभ केली.
परिसरात मराठी सैनिकांची तुकडी जमवली, सुसज्ज पागा बनवली .
मोगल आणि निजामशहा थयथयाट करत असताना अशी गोष्ट करणे धाडसी होते.