Sameer Panditrao
आपल्याला माहिती आहेच की तोरणा जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले.
त्यानंतर शिवरायांनी फार महत्वाचा गड ताब्यात घेतला
हा होता मुरुंबदेवाचा डोंगर अर्थात नंतरचा राजगड किल्ला.
महाराजांची नजर पूर्वीपासून या गडावरती होती.
या डोंगराचे ठिकाण स्वराज्याच्या दृष्टीने मोक्याचे होते.
महाराजानी हा किल्ला झटक्यात ताब्यात घेतला आणि भरपूर खर्च करून दुरुस्त केला.
दुरुस्तीनंतर या गडाचे नाव राजगड ठेवले.