Sameer Panditrao
स्वतःला आलेली समस्या, अपयश खूप मोठं वाटतं. पण शिवचरित्र यातून तुम्हाला मार्ग दाखवतं. कसे ते पहा?
महाराजांनी तोरणा आणि इतर किल्ले घेऊन सुरुवात केल्यावर त्याच्यावर बरेच सरदार चालून आले. महाराजांचे वय आणि मावळे कमी असताना त्यांनी फार धैर्याने या संकटांशी लढा दिला होता.
अफजलखान हा सर्वात मोठा शत्रू स्वराज्य पायदळी तुडवायला आला होता. महाराजांनी पहिल्या दिवसापासून योग्य व्यवस्थापन करून खानाला नेस्तनाबूत केले होते.
स्वराज्यावर सिद्धी जोहर, शाहिस्तेखान एकाचवेळी महाराजांना पकडण्यासाठी आले. महाराजांनी कोणताही उतावीळ निर्णय न घेता एकेका शत्रूचा समाचार घेतला आणि संयमाचे उदाहरण अधोरेखित केले.
महाराज चुकलेल्या व्यक्तीला कडक शिक्षा देत असत. यात कुणालाही माफी नसे.
पुरंदर तहात २३ किल्ले, मुलुख गेला तरी त्यांनी नंतर हे सर्व किल्ले, मुलुख महाराजांनी परत घेतले, यासाठी त्यांनी अविरत, अविश्रांत कष्ट घेतले.
महत्वाच्या सर्व मोहिमेत महाराज स्वतः आघाडीवर असत, जातीनिशी ते सर्वत्र लक्ष देत.