Manish Jadhav
सध्या संपूर्ण जगावर युद्धाचं सावट आहे. एकीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद तर दुसरीकडे इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष युद्धाचं कारण बनलाय.
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने मोठ्या प्रमाणात जिवितहानी होत असल्याचं दिसतंय.
आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत, ज्याने युद्धात एकही सैनिक गमावला नाही. होय, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असा एक देश अस्तित्वात आहे.
स्वित्झर्लंड या देशाने आत्तापर्यंत एकही जवान गमावला नाहीये. स्वित्झर्लंडने कायम तटस्थत धोरणाचा अवलंब केला आहे.
1815 मध्ये व्हिएन्ना काँग्रेसनंतर स्वित्झर्लंडने 'तटस्थतेचं धोरण' स्वीकारलं होतं.
देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे स्विस लष्कराचे मुख्य उद्दिष्ट आहे.