Manish Jadhav
कर्ज ही जगातील एक मोठी समस्या आहे. याचे थेट उदाहरण म्हणजे भारताचे दोन शेजारी देश, पाकिस्तान आणि श्रीलंका. कर्जामुळे हे दोन्ही देश दारिद्र्याच्या जवळपास पोहोचले आहेत. अशा स्थितीत चला तर मग जाणून घेऊया जीडीपीच्या बाबतीत सर्वाधिक कर्ज असलेल्या देशांची यादी.
जीडीपीनुसार, जपान हा जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश आहे. जपानचे एकूण कर्ज US$9.087 ट्रिलियन आहे. जे जपानच्या GDP च्या 177% आहे.
कर्जाच्या बाबतीत ग्रीसचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ग्रीसवर एकूण US$379 अब्ज कर्ज आहे. हे या देशाच्या GDP च्या 177% आहे.
कर्जबाजारी देशांच्या यादीत लेबनॉन हा मध्य-पूर्वेतील देश तिसऱ्या क्रमांकावर आहे. लेबनॉनचे एकूण कर्ज US$96.7 अब्ज आहे. जे त्याच्या एकूण जीडीपीच्या 151 टक्के आहे.
कर्जाच्या बाबतीत इटली जगात चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीवर एकूण कर्ज 2.48 ट्रिलियन डॉलर आहे. हे कर्ज इटलीच्या GDP च्या 135% आहे.
कर्जाच्या बाबतीत सिंगापूर जगात पाचव्या क्रमांकावर आहे. सिंगापूरवर $1.7 ट्रिलियनचे कर्ज आहे. सिंगापूरवर त्याच्या GDP च्या 126% कर्ज आहे.
आफ्रिकेतील केप वर्डे हा जगातील सहाव्या क्रमांकाचा कर्जदार देश आहे. केप वर्डेवर एकूण कर्ज $2.51 अब्ज आहे. केप वर्डेचे कर्ज GDP च्या 125% आहे.
कर्जाच्या बाबतीत पोर्तुगाल जगात सातव्या क्रमांकावर आहे. पोर्तुगालचे राष्ट्रीय कर्ज $254 अब्ज आहे. हे पोर्तुगालच्या GDP च्या 117% आहे.
अंगोला हा जगातील आठवा मोठा कर्जदार देश आहे. अंगोलाचे राष्ट्रीय कर्ज $64,963 दशलक्ष आहे. हे अंगोलाच्या एकूण GDP च्या 111% आहे.
भूतान हा जगातील नवव्या क्रमांकाचा कर्जबाजारी देश आहे. भूतानचे राष्ट्रीय कर्ज 2.33 अब्ज डॉलर आहे. ही रक्कम भूतानच्या GDP च्या 110% आहे.
मोझांबिक हा जगातील दहाव्या क्रमांकाचा कर्जदार देश आहे. मोझांबिकवर 17.21 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. हे मोझांबिकच्या जीडीपीच्या 109 टक्के आहे.