Aishwarya Musale
2018 मध्ये, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी इटलीमध्ये लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, रणवीरने एंगेजमेंटमध्ये दीपिकाला सिंगल सॉलिटेअर स्क्वेअर डायमंड रिंग घातली होती. या अंगठीची किंमत सुमारे 2.7 कोटी रुपये होती.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. अमेरिकन गायक निक जोनासने देसी गर्ल प्रियांका चोप्राला तिच्या एंगेजमेंटला 1.40 कोटी रुपयांची सुंदर अंगठी घातली होती.
अनुष्का शर्मानेही विराटसोबत सातासमुद्रापार लग्न करून सर्वांना चकित केले. 2017 मध्ये विराटशी गुपचूप लग्न करणाऱ्या अनुष्काच्या एंगेजमेंट रिंगची किंमत 1 कोटी रुपये आहे.
सोनम कपूर ही बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनमच्या एंगेजमेंट रिंगपासून ते मंगळसूत्रापर्यंत सर्व काही खास होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमच्या एंगेजमेंट रिंगची किंमत जवळपास 90 लाख रुपये आहे.
ऐश्वर्या राय ही जगातील सर्वात सुंदर महिला आहे आणि तिची एंगेजमेंट रिंग तिच्यासारखीच सुंदर आहे. एंगेजमेंटमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला 53 कॅरेटची सॉलिटेअर अंगठी घातली होती, ज्याची किंमत 50 लाख रुपये होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.