Akshata Chhatre
गोव्यातील उन्हाळा म्हणजे आंब्यांचा हंगाम! पण स्वस्त आणि दर्जेदार आंबे कुठे मिळतात हे माहिती असलं पाहिजे. आज पाहूया गोव्यातील काही लोकल मार्केट्स जिथे तुम्हाला चांगल्या दरात आंबे मिळू शकता.
म्हापसा मार्केट यार्ड हे फळे आणि भाज्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण. इथे स्वस्त दरात ताजे आंबे मिळू शकतात. शुक्रवारचा बाजार विशेष गर्दीचा आणि खरेदीसाठी उत्तम आहे.
तळेगाव मार्केट हे स्थानिक लोकांची पहिली पसंती आहे, स्वस्त दर आणि ताज्या आंब्यांसाठी ओळखले जाते.
म्हापसा मार्केट यार्डमध्ये स्थित हमझा फ्रेश एक्झॉटिक प्रतिष्ठित फलविक्रेता आहे. एक्सोटिक फळे आणि दर्जेदार आंब्यांचे चांगले पर्याय इथे मिळतात.
पिर्णी फिश मार्केटमध्ये असलेली ही दुकान ताज्या आणि स्थानिक आंब्यांसाठी ओळखली जातात.
मोरजी, ताळगाव, पर्रा, म्हापसा, दाबोळी या ठिकाणी देखील आंबे कमाई दारात उपलब्ध होतात.
गोव्यात ताजे, स्वस्त आणि दर्जेदार आंबे घ्यायचे असतील, तर लोकल मार्केट्स आणि विश्वासार्ह फलविक्रेते हेच योग्य ठिकाण.