Manish Jadhav
सिंह, बिबट्या, हत्ती, विषारी साप आणि इतर अनेक धोकादायक प्राणी पाळले गेले आहेत परंतु लांडगा हा एक प्राणी आहे जो कधीही पाळीव होऊ शकत नाही.
आज (9 सप्टेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून जगातील सर्वात धोकादायक लांडग्याविषयी जाणून घेणार आहोत.
जगामध्ये सर्वाधिक लांडगे अमेरिका आणि कॅनडामध्ये आढळतात.
सायबेरियन लांडग्यांच्या शरीरावर भरपूर केस असतात जे त्यांना थंडी आणि बर्फापासून वाचवण्यास मदत करतात.
लांडगा हा असा प्राणी आहे की त्याला त्याचा साथीदार मिळाला की तो आयुष्यभर त्याच्यासोबत राहतो. अत्यंत कठीण परिस्थितीतही ते एकमेकांची साथ सोडत नाहीत.
लांडग्यांचे दात इतके तीक्ष्ण असतात की ते डोळ्यांची पापणी लवायच्या आत स्वतःपेक्षा 10 पट मोठ्या प्राण्याला मारू शकतात. लांडग्यांना सुमारे 42 दात असतात.