Manish Jadhav
गोव्याचं मनमोहित करणारं सौंदर्य पर्यटकांना साद घालतं.
तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल आणि त्यातही तुम्हाला पक्षी निरिक्षणाचा छंद असेल तर तुम्ही करमळी तलावाला नक्की भेट दिली पाहिजे.
पक्षी निरीक्षण करणे किंवा पक्षाचे छायाचित्र काढण्याचा छंद असणाऱ्यांसाठी हा तलाव म्हणजे एक पर्वणीच आहे.
गोव्यातल्या सगळ्याच तलावांजवळ पक्षी आढळतील असे नाही, मात्र कारंबोळ तलाव हा अपवाद आहे.
हजारो पक्षी आढळणाऱ्या या तलावाजवळ सप्टेंबरच्या सुरुवातील 500 हुन अधिक पक्षी आढळतात. यानंतर फेब्रुवारी महिन्यापर्यंत येथील पक्षांची संख्या 10,000 पर्यंत जाते.
पिनटेल बदक, विसल टील्स या पक्षांसाठी हा तलाव माहेरघर आहे.