Maruti e-Vitara SUV: मारुती ‘ई-विटारा’ कधी लॉन्च होणार? पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीची उत्सुकता शिगेला पोहोचली!

Manish Jadhav

‘ई-विटारा’‘

ई-विटारा’ ही मारुती सुझुकी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, ज्याची निर्यात सुरु झाली आहे.

Maruti e-Vitara SUV | Dainik Gomantak

जागतिक पोहोच

ही इलेक्ट्रिक कार जपान आणि युरोपसह जगभरातील जवळपास 100 देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे.

Maruti e-Vitara SUV | Dainik Gomantak

भारतात कधी लॉन्च होणार?

ही शानदार कार आधी परदेशी बाजारात लॉन्च केली जाईल. त्यानंतर चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच मार्च 2026 पूर्वी ती भारतात लॉन्च होईल.

Maruti e-Vitara SUV | Dainik Gomantak

उत्पादन केंद्र

मारुती ई-विटाराचे उत्पादन सुझुकीच्या गुजरात येथील अत्याधुनिक कारखान्यात केले जाईल.

Maruti e-Vitara SUV | Dainik Gomantak

किंमत

अधिकृत किंमत अजून जाहीर झाली नसली तरी भारतात या धमाकेदार कारची अंदाजित किंमत 20 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते.

Maruti e-Vitara SUV | Dainik Gomantak

प्रमुख स्पर्धक

भारतात लॉन्च झाल्यावर ई-विटाराची थेट स्पर्धा हुंडई क्रेटा इलेक्ट्रिक, एमजी झेडएस ईव्ही, टाटा कर्व ईव्ही आणि महिंद्रा बीई-6 यांसारख्या एसयूव्हीशी असेल.

Maruti e-Vitara SUV | Dainik Gomantak

बॅटरी आणि रेंज

या कारमध्ये दोन बॅटरीचे पर्याय मिळतील. एक 49 kWh आणि दोन 61 kWh. मोठी बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर 500 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकते.

Maruti e-Vitara SUV | Dainik Gomantak

खास फीचर्स

ई-विटारा ‘हार्टेक्ट-ई’ (Heartect-e) प्लॅटफॉर्मवर बनली आहे. यात ड्युअल मोटर AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) सिस्टीम मिळेल.

Maruti e-Vitara SUV | Dainik Gomantak

Mahurgad Fort: इतिहासनिसर्ग अन् अध्यात्म यांचा सुवर्ण संगम, विविध राजवटींच्या इतिहासाची साक्ष देणारा

आणखी बघा