Akshata Chhatre
सध्या मुलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केस कापले जातायत, फॅशनचा तो भाग झालाय. पण तुम्ही कधी विचार केलाय का की मुलींनी नेमके कधी केस कापावेत?
केसांच्या प्रकारानुसार आणि स्टाईलनुसार ६ ते १२ आठवड्यांनी केस कापणे योग्य असते.
जर का तुमचे केस छोटे असतील. म्हणजे शॉट कट केला असेल तर ४-६ आठवड्यांनी एकदा ट्रिम करणं देखील स्टाईल टिकवण्यासाठी पुरेसं असतं.
तुमचे केस जर का खांद्याच्या वर असतील म्हणजेच बॉब कट सारख्या प्रकारात असतील तर ६-८ आठवड्यांनी एकदा केस ट्रिम करा, कारण शेप राखण्यासाठी नियमित ट्रिम आवश्यक आहे.
तुम्हाला लांब केस आवडत असतील तर ३ -६ महिन्यांनी एकदा जर फक्त टोकं तुटत असतील तर केस कापणं सुद्धा पुरेसं असतं.
तुम्ही चेहऱ्या भोवती लेयर्स ठेवलेत? आणि आता केस कधी कापावेत असा प्रश्न पडलाय तर ६-८ आठवड्यांनी केस ट्रिम करा कारण स्टाईल ताजी दिसण्यासाठी हीच योग्य वेळ असते.