Akshata Chhatre
१५५६ मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यात किंवा भारतात एक मोठा बदल घडवून आणला, तो म्हणजे छापखाना. ओल्ड गोव्यातील सेंट पॉल कॉलेजमध्ये एका नवीन युगाची सुरुवात झाली.
लाकडी अक्षरे, शाई आणि कागदाच्या मदतीने पाने तयार करणारा छापखाना गोव्यात सुरु झाला. सुरुवातीला या छापखान्याचा उद्देश धार्मिक पुस्तके छापण्याचाच होता.
सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांनी लिहिलेले Catecismo da Doutrina Crista पहिले पुस्तक गोव्यात छापले गेले.
या छापखान्यामुळे हळूहळू पुस्तके, माहितीपत्रके छापायला सुरुवात झाली आणि ज्ञानाचा प्रसार सुरू झाला.
गोव्यातील या छोट्याशा छापखान्याने भारतात मुद्रण तंत्रज्ञानाची सुरुवात केली.
गोव्यातील पहिले मुद्रणालय म्हणजे भारताच्या ज्ञानाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरला.
या मुद्रणालयमुळे सुरु झालेली अक्षरांची जादू आजही कायम आहे.