Akshata Chhatre
वाळपईचे आमदार आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यातील राजकारणाचा महत्वाचा भाग आहेत.
वाळपईत आरोग्यमंत्र्यांनी केलेला कायापालट कुणापासून लपलेला नाही. वाळपईत राणे यांना सगळेजणं प्रेमाने 'बाबा' असं म्हणतात.
या मागचं कारण म्हणजे त्यांनी वाळपईच्या विकासासाठी केलेले बदल. शहरी भागांपासून दूर असलेल्या वाळपई प्रदेशात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी विश्वजित राणे यांनी मोठा हातभार लावलाय.
वाळपईमध्ये उभं असलेलं हॉस्पिटल, रुंद रस्ते, फळ-भाज्यांसाठी वेगळी जागा, बस स्टॅन्ड हे आवश्यक बदल राणे यांनी घडवून आणलेत.
विश्वजित प्रतापसिंग राणे यांचा आज जन्मादिवस, आणि याच निमित्ताने त्यांच्या पत्नी आणि पर्येच्या आमदार देविया राणे यांनी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्यात.
तुमच्या कामामुळे गोवा आणि सत्तरीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे, तुम्ही नेहमीच आम्हाला प्रेरणा देता.
हे वर्ष तुम्हाला चांगले आरोग्य, आनंद आणि तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये सतत यश घेऊन येवो. असं म्हणत पत्नी देविया राणे यांनी विश्वजित राणे यांना, "माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा" असं म्हणत इंस्टग्राम पोस्ट केली आहे.