Pramod Yadav
याच दिवशी २५ नोव्हेंबर १५१० रोजी पोर्तुगिजांनी गोवा जिंकला होता, आफोन्सो दी अल्बुकुर्क या खलाशाने यापूर्वी दोन दोनवेळा गोवा जिंकण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्या वेळी त्यांना यश आले.
गोवा जिंकल्यानंतर पोर्तुगिजांनी ओल्ड गोवा त्यांची राजधानी म्हणून निश्चित केली. त्यानंतर हे शहर रोम ऑफ द ईस्ट म्हणून प्रसिद्धस आले.
आफोन्सोने गोव्यावर विजय मिळवला त्यावेळी सेंट कँथरिनचा फेस्त होता. त्यामुळे आफोन्सोने गोव्यात चॅपेल उभारण्याची शपथ घेतली.
सेंट कँथरिन चॅपेलवर उभारण्यात आलेल्या कोनशिलेवर गोव्यावर विजयाचा आणि आफोन्सो दी अल्बुकुर्कचा उल्लेख आढळतो.
आफोन्सो दी अल्बुकुर्कने शपथ घेतल्याप्रमाणे कालांतराने ओल्ड गोव्यात से कॅथेड्रल उभारण्यात आले.
पोर्तुगिजांनी तब्बल ४५० वर्षे गोव्यात राज्य केले. गोव्यावर राज्य करताना त्यांनी येथील लोकांवर अन्वनित अत्याचार केले.
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील १४ वर्षे गोव्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडावे लागले अखेर १९ डिसेंबर १९६१ मध्ये गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झाला.