Sameer Amunekar
साप हे उंदरांचे नैसर्गिक भक्षक आहेत. साप नसल्यास उंदरांची संख्या प्रचंड वाढेल, ज्यामुळे पिके नष्ट होण्याची शक्यता वाढेल.
उंदीर व कीटक पिकांची नासधूस करतात. सापांची अनुपस्थितीमुळे कृषी उत्पादन घटेल, आणि अन्न टंचाईचा धोका निर्माण होईल.
साप हे अन्नसाखळीतील मध्यस्थ आहेत – ते काही प्रजातींचे भक्षक आहेत आणि काही प्रजातींना अन्न म्हणून काम करतात. त्यांची अनुपस्थिती ही साखळी कोसळवू शकते.
साप खाणारे पक्षी, उंदीर पकडणारे प्राणी किंवा काही शिकारी प्रजाती सापांवर अन्नासाठी अवलंबून असतात. त्यांना देखील अन्नटंचाईचा सामना करावा लागेल.
सापांच्या विषामधून अनेक औषधे बनवली जातात, विशेषतः न्यूरो आणि हार्ट संबंधित आजारांवर. यामुळे औषध क्षेत्राला मोठा धक्का बसेल.
उंदीर, घुबड व अन्य कीटकांमुळे पसरणाऱ्या रोगांची शक्यता वाढेल, ज्यामुळे आरोग्य संकट निर्माण होऊ शकते.
साप हे नैसर्गिक परिसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या गायब होण्याने संपूर्ण जैवविविधतेचा ढाचा कोसळण्याचा धोका निर्माण होईल.