Sameer Panditrao
युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन जर वायु हल्ल्याची सूचना आल्यास किंवा ब्लॅकआऊट जारी केल्यास प्रशासकीय यंत्रणा, आपत्कालीन यंत्रणा आणि सामान्य नागरिकांनी काय करावे
या काळात आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटर्स (EOCS) बॅकअप पॉवर, कम्युनिकेशन टूल्स आणि आपत्कालीन प्रकाशयोजनेसह कार्यरत राहिल्या पाहिजेत व त्यांनी लष्करी कमांड, स्थानिक प्रशासन आणि EOCS सह समन्वय राखला पाहिजे.
हवाई हल्ल्याचा इशारा झाल्यास सुमारे दोन मिनिटांचा सायरन वाजणार असून धोक्याचा इशारा संपल्यावर पुन्हा एकदा सायरन वाजेल.
मध्यंतरीच्या काळात सामान्य जनतेने हवाई हल्ला झाल्यास सूचीत केलेल्या आश्रयस्थानांवर किंवा संरक्षक खंदकांत जावे किंवा यासाठी निश्चित केलेल्या अन्य सुरक्षित ठिकाणी जावे.
सूचीत केलेल्या आश्रयस्थानाकडे जाता आले नाही तर लोकांनी घरातच राहावे मात्र त्यांनी खिडक्या आणि बाहेरच्या बाजूने असलेल्या भिंतीपासून दूर राहावे
या काळात जनतेने शांतता राखावी आणि आपत्कालीन संपर्कासाठी फोन लाईन्ससाठी टेलिफोन आणि मोबाईल नेटवर्कचा अनावश्यक वापर टाळावा.
ब्लॅकआउट जाहीर केल्याससर्व वीजेचे दिवे बंद करावेत. प्रकाश बाहेर पडू नये यासाठी खिडक्या अपारदर्शक पदार्थांनी झाकाव्यात असे सूचीत करण्यात आले आहे.
सार्वजनिक वाहनांनी सूचना मिळाल्यानंतर लगेच वाहनांचे दिवे बंद करून आपली वाहने जवळच्या सुरक्षित स्टेशनवर थांबवावीत. खासगी वाहनांनी आपल्या वाहनांचे दिवे बंद करून रस्त्याच्या बाजूला ती पार्क करावीत.