Akshata Chhatre
आजकाल प्रत्येक घरात स्मार्टफोन आहे, त्यामुळे लहान वयातच बाळांमध्ये मोबाईलची ओढ निर्माण होते. ही सवय पुढे व्यसनात बदलू शकते.
विशेषज्ञ सांगतात की २ ते ५ या वयात मोबाईल देऊ नये. याऐवजी शारीरिक खेळ, संवाद आणि सर्जनशील उपक्रमांकडे लक्ष केंद्रित करावं.
६ ते १२ या वयात शिक्षणासाठी मर्यादित वापर योग्य आहे. पालकांनी यावेळी देखरेखीखाली वापर करायला द्यावा.
१८ महिन्यांखालील मुलांनी मोबाईल टाळावा. ६ किंवा अधिक मोठ्या मुलांनी १-२ तास मोबाईल पाहावा, तोही गुणवत्ता असलेला कंटेंट पाहण्यासाठीच.
स्क्रीन टाइम कमी ठेवा, दर्जेदार कंटेंट निवडा आणि मोबाइलचा वापर ‘माध्यम’ म्हणून करा, त्यावर अवलंबून राहू नका.