Sanket Kulkarni
T-20 मधून टीम इंडिया (Team India) आणि IPL मध्ये RCB चे कर्णधार पद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने (Virat Kohli) घेतला आहे.
विराटने T-20 मध्ये कर्णधारपद सोडण्यामागे त्याच्यावर असणारा वर्कलोड हे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर फोकस करावे अशी BCCI ची इच्छा आहे.
विराट कोहलीने 2010 मध्ये झिम्बावे विरुध्द पहिला टी-20 सामना खेळला आणि 2017 त्याने टी-20 मध्ये भारताचा कर्णधार झाला.
विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने 45 सामने खेळले असून, त्यात 27 सामने जिंकले आहेत.
कर्णधारपदाच्या वर्कलोडमुळे विराटचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत असल्याचे दिसते आहे. कारण त्याच्या बॅटमधून सध्या मोठी खेळी होत नाही.
पण असेही बोलले जात आहे की, BCCI चा देखील विराटवर दबाव आहे. कारण BCCI प्रशिक्षक रवी शास्त्रीयांच्या नंतर आता अनिल कुंबळे यांना पुन्हा प्रशिक्षकपदी आणण्याच्या तयारीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.