Akshata Chhatre
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल. राहुल लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत! त्यांनी नुकताच एक सुंदर प्रेग्नंसी फोटोशूट शेअर केला आहे.
१२ मार्चला अथिया आणि राहुलने इंस्टाग्रामवर प्रेग्नंसी फोटोशूटच्या सुंदर छायाचित्रांसह एक खास पोस्ट शेअर केली. या फोटोंमध्ये अथिया बेबी बंपसह दिसते, तर राहुल तिला प्रेमाने कवटाळताना पाहायला मिळतोय.
या गोड क्षणांना त्यांनी एक साधे पण गोड कॅप्शन दिले – “Oh, baby!” या एका वाक्यात त्यांनी आपल्या आनंदाची भावना व्यक्त केली.
अथियाने आपल्या प्रेग्नंसी फोटोशूटमध्ये अतिशय सुंदर आणि स्टायलिश कपडे परिधान केले होते. तिच्या आउटफिट्सने मॅटर्निटी स्टाईलसाठी एक नवीन ट्रेंड सेट केला आहे.
या फोटोशूटमध्ये काही फोटोंमध्ये अथिया एकटीच दिसते, आनंदाने हसताना आणि सुर्यकिरणांचा आस्वाद घेताना. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या मातृत्वाच्या प्रवासाचे सौंदर्य दाखवतो.
अथिया आणि राहुलने ८ नोव्हेंबर २०२३ रोजी आपल्या प्रेग्नंसीची अधिकृत घोषणा केली होती. तेव्हापासूनच चाहत्यांना त्यांच्या बाळाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली आहे!
अथिया आणि राहुल आता त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.