Pramod Yadav
पालकत्व ही मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलाला आदर्श व्यक्ती करण्यासाठी प्रयत्नशील असतो.
आजकाल, पालकत्वाची अशी एक पद्धत चर्चेत आहे, ज्याला पांडा पॅरेंटिंग म्हणतात.
मोठमोठे सेलिब्रिटी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी आणि त्यांना एक चांगला माणूस बनवण्यासाठी पालकत्वाची ही पद्धत अवलंबत आहेत.
मानसशास्त्रज्ञाच्या मतानुसार पांडा पालकत्व मुलांना अधिक स्वावलंबी बनवते, त्यांना स्वतःचे निर्णय त्यांना स्वतः घेण्यास प्रोत्साहित करते.
या मुलांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो आणि मुले जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यास शिकतात. त्यांच्या चुका अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम होतात.
पांडा पॅरेंटिंगमध्ये पालक लहानपणापासूनच मुलांना स्वतःचे निर्णय घेण्यास शिकवतात. यात मुलांना प्रत्येक लहान-मोठा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाते.
यामुळे मुलांना त्यांच्या समस्यांचे स्वत:च घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच, यातून कोणते दोष आहेत याची देखील कल्पना मिळते.