Actor Ajith Kumar: सुपरस्टार अजित कुमारचा रेसिंग ट्रॅकवर अपघात; Video व्हायरल!

Manish Jadhav

दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार

दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार सध्या चर्चेत आहेत. मात्र ही चर्चा त्यांच्या चित्रपटाची नसून त्यांच्या रेसिंग कारच्या अपघाताची आहे.

Actor Ajith Kumar | Dainik Gomantak

रेसिंग कार

अजित कुमार यांना रेसिंगची किती आवड आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. 2000 च्या दशकात त्यांनी रेसिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता.

Actor Ajith Kumar | Dainik Gomantak

व्हिडिओ

मात्र नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्यांची रेसिंग कार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली दिसत आहे.

Actor Ajith Kumar | Dainik Gomantak

रेसिंगची तयारी

दुबई 24 अवर्स रेसिंगची तयारी करत असलेले अजित कुमार मंगळवारी (7 जानेवारी) रेसिंग ट्रॅकवर झालेल्या अपघातानंतर चर्चेत आले. अपघातानंतर अजित यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

Actor Ajith Kumar | Dainik Gomantak

थोडक्यात बचावले

या भीषण अपघातात अजित कुमार थोडक्यात बचावले. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

Actor Ajith Kumar | Dainik Gomantak

अजित कुमार रेसिंग

तब्बल एक दशकानंतर ते त्यांच्या टीम 'अजित कुमार रेसिंग'सोबत ट्रॅकवर परतले आहेत. या रेसिंगमध्ये ते मॅथ्यू डेट्री, फॅबियन डुफिक्स आणि कॅमेरॉन मॅक्लिओड या त्यांच्या सहकारी खेळाडूंशी स्पर्धा करणार होते.

Actor Ajith Kumar | Dainik Gomantak

कोण आहेत अजित कुमार?

अजित कुमार हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यासोबतच त्यांची रेसिंगची आवडही कौतुकाचा विषय ठरली आहे.

Actor Ajith Kumar | Dainik Gomantak

चित्रपट

सध्या ते त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त होते, ज्यात ‘विदामुइर्ची’ आणि ‘गुड बॅड अग्ली’ यांचा समावेश आहे. "गुड बॅड अग्ली", ज्यात त्रिशा देखील मुख्य भूमिकेत आहे, आगामी पोंगल सणाच्या मुहुर्तावर हे चित्रपट रिलीज होऊ शकतात.

Actor Ajith Kumar | Dainik Gomantak
आणखी बघा