Pramod Yadav
माजी भारतीय क्रिकेटर आशिष नेहरा त्याच्या गोव्यातील जागेवरुन अडचणीत सापडला आहे.
केळशी येथील नेहराच्या मालमत्तेत जाण्यासाठी अवैध पद्धतीने रस्ता केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
अवैध रस्त्यावरुन पंचायतीकडे तक्रार प्राप्त झाल्यानतंर नेहराला stop work order बजावण्यात आली आहे.
नेहराच्या खासगी जागेत जाण्यासाठी केला जात असलेल्या रस्त्यावरुन आप आमदार वेंझी व्हिएगस आणि सरपंच वाझ यांच्यात वाद झाला.
अवैध रस्त्यामुळे केळशी समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा मार्ग बंद झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला.
अवैध रस्त्याचे प्रकरण समोर आल्यानंतर केळशी पंचयात परिसरात वातारण चांगलेच तापले.
जमीन पूर्वस्थितीत आणण्याचे आदेश काढण्याचे काम सीआरझेडचे असल्याचा दावा सरपंच डिक्सन वाझ यांनी केला.