Pramod Yadav
हरवळेतील श्री रुद्रेश्वर मंदिरात रविवारी (दि.07) रात्री मासिक पालखीवेळी मोठा गोंधळ झाला.
महाशिवरात्रीला मंदिरात गोंधळ घातलेल्या लोकांकडून पुन्हा गोंधळ घालत पालखी खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवस्थानचे सचिव सुभाष किनळकर यांनी केला.
वरचे हरवळेतील सातेरकर गटाकडून मंदिरातील सणांमध्ये हक्क दाखविण्याचा प्रयत्न करून गोंधळ माजविला जात असल्याचा आरोप किनळकरांनी केला.
हरवळेतील श्री रुद्रेश्वर मंदिर हे भंडारी समाजाचेच आहे, असे किनळकर म्हणाले.
तर, रुद्रेश्वर मंदिरात आम्हाला मान असून, तो कोणीही काढून घेऊ शकत नाही, असा असा खुलासा वरचे हरवळे येथील श्री सातेरकर गटाने केला.
सातेरकर गटाने उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर यापुढे मंदिरातील उत्सवांमध्ये कोणताही वाद किंवा गोंधळ न घालण्याचे मान्य केले आहे.
अखेर हा विषय सामोपचाराने मिटल्याचे दोन्ही गटांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
मात्र, आपचे नेते अमित पालेकर यांनी वाद मिटला कसे म्हणता? असे म्हटल्याने पुन्हा एकदा याप्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.