गोव्यात दाबोळी विमानतळावरून वाद का होतोय?

Pramod Yadav

कतार एअरवेज

दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावरील कामकाज येत्या 20 जूनपासून मोपावर वळविण्याची घोषणा कतार एअरवेजने केली आहे.

Dabolim Airport

तिसरी विमान कंपनी

गॅटविक, ओमाननंतर आता कतार एअरवेजने दाबोळी ऐवजी मोपाच्या दिशेने मोर्चा वळविल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

Dabolim Airport

दाबोळी बंद होण्याची भीती

या घडमोडींमुळे दाबोळी विमानतळ बंद होण्याची भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.

Dabolim Airport

वापरकर्ता विकास शुल्क

येत्या तीन वर्षात दाबोळीवरील वापरकर्ता विकास शुल्कात 540 टक्क्यांनी वाढ होईल, असे आमदार सरदेसाई म्हणाले.

Dabolim Airport

मोठी तफावत

2027-28 पर्यंत दाबोळीवरील शुल्क 1,791 असेल तर मोपावरील 840 असेल आणि ही मोठी तफावत असल्याचे ते म्हणाले.

Dabolim Airport

जीएमआर कंपनी

मोपावर हवाई वाहतूक वळविण्यासाठी जीएमआर कंपनी केंद्रीय स्तरावर दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप मंत्री माविन गुदिन्हो यांनी केला.

Mopa Airport

मोदींचा दोहा दौरा

तर, पंतप्रधान मोदी दोहा दौऱ्यावरुन आल्यानंतर माविन यांनी जीएमआर कंपनीवर आरोप केल्याने अमित पाटकर यांनी याचे धागेदोरे जोडले.

Mopa Airport

फ्लाईटची संख्या कमी होईल

दरम्यान, कतार एअरवेजच्या निर्णयामुळे फ्लाईटची संख्या कमी होईल पण दाबोळी बंद होणार नाही असे दाबोळीचे संचालक डी. राव म्हणाले.

Mopa Airport

घोस्ट विमानतळ

विमानसंख्या कमी झाल्याने दाबोळी घोस्ट विमानतळ होईल अशी भीती विरोधक व्यक्त करत असून, सरकार विमानतळ कदापी बंद होणार नाही असा दावा करत आहे.

Mopa Airport