Pramod Yadav
पर्वरीत गोव्यातील सर्वात मोठ्या 21 फूट उंचीच्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पर्वरी येथील ‘मॉल द गोवा’च्या मागील जागेत शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.
शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह पर्यटनमंत्री रोहन खंवटे, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार कार्लुस फेरेरा, मंत्री नीळकंठ हळर्णकर उपस्थित होते.
पुतळा उभारण्यात आलेल्या चौकाचे नामकरणही ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे करण्यात आले आहे.
पुतळा अनावरण सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी भेट देऊन शस्त्रांची पाहणी केली.
शिवरायांनी जिजाऊंकडून राजकारणाचे धडे घेऊन 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले, असे यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले.