Pramod Yadav
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे निधन झाले आहे.
एका आकडेवारीनुसार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्तनाच्या कर्करोगानंतर सर्वात जास्त आढळणारा कर्करोग आहे.
विषाणू संसर्ग हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे प्रमुख कारण, या विषाणूच्या विविध प्रजातीमुळे कर्करोग होऊ शकतो.
प्रथम हा विषाणू सर्व्हिसायटिस या अवयवावर हल्ला करतो, यामुळे गर्भाशय मुखामध्ये सूज होते.
अनेक स्त्रियांमध्ये हा विषाणू संसर्गानंतर काढून टाकला जातो, परंतु काही स्त्रियांमध्ये संसर्ग कायम राहतो ज्याला क्रॉनिक सर्व्हिसायटिस म्हणतात.
या संसर्गामुळे पुढे जाऊन 10 किंवा 15 वर्षांनंतर त्याचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते.
गर्भाशय मुखाचा कर्करोग सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असून, शारीरिक संबंधामुळे हा विषाणू पुरुषांच्या माध्यमातून महिलांमध्ये पसरतो.