Gym Tips: "जीम सोडताच वजन दुप्पट वेगाने वाढते?" फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी 7 महत्त्वाच्या टिप्स

Manish Jadhav

वजन वाढत नाही

जीम सोडल्यामुळे थेट वजन वाढत नाही. जीम बंद झाल्यावर तुमचा शारीरिक व्यायाम कमी होतो, पण जर तुमचा कॅलरी इनटेक (खाणे) पूर्वीसारखाच राहिला, तर उरलेली ऊर्जा चरबीच्या (Fat) रुपात साठते. कॅलरीज संतुलित ठेवल्यास वजन वाढत नाही.

Gym Tips | Dainik Gomantak

स्नायू आणि चरबी वेगळ्या उती

स्नायू आणि चरबी या दोन पूर्णपणे वेगळ्या उती (Tissues) आहेत. स्नायूंचे कधीही चरबीत रुपांतर होऊ शकत नाही. व्यायाम सोडल्यावर फक्त स्नायूंचा आकार लहान होतो आणि व्यायाम नसल्याने चरबी वाढू शकते.

Gym Tips | Dainik Gomantak

प्रोटीन पावडर

प्रोटीन पावडर हे केवळ दुधापासून बनवलेले पूरक अन्न आहे. ते सोडल्यामुळे शरीर खराब होत नाही. परंतु, व्यायामाअभावी आणि आहारात नैसर्गिक प्रोटीनची कमतरता भासल्यास टोनिंग कमी होऊ शकते.

Gym Tips | Dainik Gomantak

आहाराचे नियंत्रण

उपासमार करण्याची अजिबात गरज नसते. व्यायाम बंद झाल्यावर फक्त तुमच्या दैनंदिन हालचालींनुसार आहाराचे प्रमाण थोडे नियंत्रित करावे लागते, जेणेकरुन अतिरिक्त कॅलरीज पोटात जाणार नाहीत.

Gym Tips | Dainik Gomantak

वजन नियंत्रणाचा मार्ग

केवळ जीम किंवा धावणे हाच वजन नियंत्रणाचा मार्ग नाही. जीम सोडल्यानंतरही तुम्ही घरच्या घरी योगा, वॉकिंग (चालणे), सायकलिंग किंवा स्विमिंग करून सहज फिटनेस आणि वजन टिकवून ठेवू शकता.

Gym Tips | Dainik Gomantak

अचानक चुकीची पद्धत

योग्य फॉर्ममध्ये केलेला व्यायाम सांधे मजबूत करतो. जीम सोडल्यानंतर दुखणे सुरु होण्याचे मुख्य कारण म्हणजे अचानक पूर्णपणे निष्क्रिय (In-active) जीवनशैली जगणे किंवा अचानक चुकीच्या पद्धतीने वजनदार वस्तू उचलणे.

Gym Tips | Dainik Gomantak

'मसल मेमरी'

आपल्या शरीरात 'मसल मेमरी' नावाची संकल्पना असते. तुम्ही जेव्हा पुन्हा वर्कआउट सुरु करता, तेव्हा तुमचे शरीर आधीपेक्षा खूप वेगाने पूर्वस्थितीत येते आणि रिझल्ट्स मिळतात.

Gym Tips | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा