'अ‍ॅनिमल' फिल्ममुळे चर्चेत आलेले 'अल्फा मेल' म्हणजे नेमके काय? जाणून घ्या त्यांचे गुण...

Akshay Nirmale

अ‍ॅनिमल चित्रपट

अभिनेता रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यातील व्यक्तिरेखांवरून दिग्दर्शकाला ट्रोलही केले जात आहे.

Alpha Male | Dainik Gomantak

रणबीरची भूमिका

या चित्रपटात रणबीर कपुरला अल्फा मेल दाखवले गेले आहे. एका दृश्यात तो अल्फा मेल कोण असतात तेही सांगतो. तो सतत सिगारेट फुंकतो, आक्रमक होतो, पत्नीला मारतो, परस्त्रीशी संबंध ठेवतो.

Alpha Male | Dainik Gomantak

काय असतात अल्फा मेल?

ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरीनुसार, एका विशिष्ट गटात सर्वात जास्त शक्ती असणारी व्यक्ती म्हणजे अल्फा मेल म्हणजे नर. दुसऱ्या व्याख्येनुसार सामाजिक आणि व्यावसायिक परिस्थितींवर नियंत्रण ठेवणारा पुरूष म्हणजे अल्फा मेल.

Alpha Male | Dainik Gomantak

असे आहेत अल्फा मेलचे गुण...

तज्ज्ञांच्या मते, अल्फा मेल हा आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो. त्याला त्याच्या सामर्थ्यावर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो.

Alpha Male | Dainik Gomantak

आव्हानांसाठी सज्ज

ज्याच्याकडे अल्फा पुरुषाचे पात्र आहे तो स्वतःवर संशय घेणे थांबवतो आणि नवीन आव्हानांसाठी तयार राहतो.

Alpha Male | Dainik Gomantak

परिस्थितीच्या आकलनात तरबेज

अल्फा मेलमध्ये नैसर्गिक नेतृत्व गुण असतात. लोकांना चांगले मार्गदर्शन कसे करायचे हे त्याला माहीत असते. ते परिस्थितीचे आकलन करण्यात तरबेज असतात आणि कठोर निर्णय घेण्यास तयार असतात. त्यांची देहबोली सशक्त असते. आपले विचार हे लोक प्रभावीपणे मांडतात.

Alpha Male | Dainik Gomantak

मेहनती, हुशार

अल्फा मेल आक्रमक न होताही स्पर्धेत भाग घेतात. गरज असते तेव्हा 'नाही' कसे म्हणायचे आणि मागे कसे जायचे हे त्यांना चांगले माहित आहे. ते त्यांचे ध्येय गाठण्यासाठी खूप मेहनतही करतात. नातेसंबंध असो किंवा व्यवसाय, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांची चांगली तयारी असते.

Alpha Male | Dainik Gomantak
Goa Night Life | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...