Sameer Amunekar
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही भारतीयांसाठी केवळ क्रिकेटची स्पर्धा नाही, तर ती एक भावना, एक जल्लोष, एक उत्सव आहे.
२००८ मध्ये सुरू झालेली ही टी-२० लीग आज जागतिक पातळीवर सर्वाधिक लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी क्रिकेट स्पर्धांपैकी एक झाली आहे.
आयपीएलमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळतात. खेळाडूंना लिलाव प्रक्रियेतून संघ विकत घेतात.
आयपीएल स्पर्धेत केवळ नमांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू नव्हे, तर नवोदित तरुणांनाही आपली चमक दाखवण्याची संधी मिळते. हेच आयपीएलचं वैशिष्ट्य ट्रॉफीवर कोरलेल्या एका श्लोकातून अत्यंत सुंदररीत्या मांडलेलं आहे.
ट्रॉफीवर "यत्र प्रतिभा अवसरं प्राप्नोति" हा श्लोक संस्कृतमध्ये असून याचा अर्थ "जिथे प्रतिभेला संधी मिळते", असा आहे. हा श्लोक तरुणांना खूप प्रेरणा देतो.
अनेक नवोदित खेळाडूंनी आयपीएलमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमठवला आहे.
शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, ईशान किशन, सूर्यकुमार यादव यांसारखे अनेक खेळाडू याच स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं आहे.